अजित पवारांचे केस का गेले ?, अजितदादांनी सांगितलेला मजेदार किस्सा !

अजित पवारांचे केस का गेले ?, अजितदादांनी सांगितलेला मजेदार किस्सा !

बारामती – आपल्या खास विनोदी शैलीतील भाषणासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या सभांमधून किस्से सांगत उपस्थितांना हसवण्याची कला अजितदादांना अवगत आहे. शुक्रवारी केलेल्या भाषणातही अजितदादांनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांचा हशा पिकला होता. बारामतीत बोलताना अजितदादांनी फेटा बांधण्यावरून चक्क आपले केस जायला लागल्याचं म्हटलं आहे. इतकच काय तर हे केस बारामतीकरांसाठी काम करतोय म्हणून गेले की पत्नी सुनेत्रा यांच्यामुळे असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी सभागृहाला हसवलं आहे.

 

मराठा सेवा संघाच्या जिजामाता भवनात राजमाता जिजाऊ व बालशिवाजी पुतळयाचं अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झालं.. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपण फारसं फेटा बांधत नाही, मात्र आयोजकांनी आग्रह केल्यानं फेटा बांधल्याचं सांगताना आता आपल्या डोक्यावर केसही राहिले नसल्याचं म्हटलं. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकरांसाठी काम करत असल्यामुळे केस गेले की पत्नी सुनेत्रा यांच्यामुळे असं आपण कधीकधी पत्नीला विचारतो असं म्हणत अजितदादांनी उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडवले.

COMMENTS