मुंबई – सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून यापुढेही चौकशीला मी पूर्ण सहकार्य करीत रहीन, असे त्यांनी म्हटले आहे. बहुचर्चित सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे प्रकरण सध्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याने याच्या तपासणी प्रक्रियेत बाधा येऊ नये याची मी काळजी घेत आहे. तशा सूचना माझ्या वकिलांनी मला केल्याने मला यावर जास्त बालोयचे नाही. या प्रकरणी वेळोवेळी चौकशीला बोलावलं तेव्हा मी गेलो आहे. यापुढेही चौकशीला पूर्ण सहकार्य करीत राहीन. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सिंचन प्रकरणी तत्कालीन विरोधकांनी माझ्यावर विविध आरोप केले, त्यावर मी सरकारमध्ये असतानाही वारंवार स्पष्टीकरण दिले होते. तसेच यावर श्वेतपत्रिकाही काढण्यात आली होती. मात्र, तरीही अद्याप माझ्यावर आरोप होत आहेत.
सरकार त्यांच काम करतंय असं वाटतंय, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच सध्या अधिवेशनाचा काळ सुरु असून माझ्यासाठी सिंचन प्रकरणापेक्षा मराठा आरक्षण, या संदर्भातील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, धनगर आरक्षणासंदर्भतला टीसचा अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यास सरकारला भाग पाडणे ही प्राथमिकता असल्याचंही अजित पवार यांनीम्हटलं आहे.
COMMENTS