मुंबई : सांगलीत एका ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री बनण्याची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्या इच्छेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या इच्छाला माझा पाठिंबा आहे, असे उत्तर दिले.
इस्लामपूरातील एका स्थानिय चॅनेलला मुलाखतीत जयंत पाटील म्हणाले, गेली 25 ते 30 वर्ष मी राजकारणात काम करतोय. माझं मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं महत्त्वाचं आणि मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं. पाटलांच्या याच विधानावर अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो”.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी ‘एमपीएससी’च्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. सरकारला अडचणीत आणणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मंत्रिमंडळाची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधितांविरुध्द मुख्यसचिव कारवाई करतील, असे अजित पवार यांनी सांगितले
COMMENTS