पुणे – लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आहे. त्यामुळे त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का? याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमधील औंध रावेत उड्डाणपूलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान केंद्र सरकारने जाहीर केलेले 21 लाख कोटी कोणाला भेटणार या बाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, असं सांगत अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असल्याचंही ते म्हणालेत. तसेच लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं आहे.
COMMENTS