पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्ता खेचून आणण्यात यश आलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळवण्यात यश आलं आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माळेगाव साखर कारखाना पाच वर्षांपूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आले आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला होता. मतमोजणीवेळी दोन मतं बाद ठरवल्याने रंजन तावरे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला होता. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली होती.त्यामुळे काल सकाळी सुरु झालेली मतमोजणी काही काळ थांबली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मतमोजणीची प्रक्रिया सुरु राहिली. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे.
COMMENTS