मुंबई – मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोनात जवळपास 42 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. तसेच याबाबतचा मुद्दा शिवसेनेनंही उचलून धरला असून मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांतील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी विधानसभेत सुनिल प्रभू यांनी केली आहे.
दरम्यान मराठा आंदोलनादरम्यान अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांनी हे सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS