मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या – अजित पवार

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या – अजित पवार

मुंबई –  आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. समाजाला आरक्षण मिळालं ही बाब आनंदाची आहे यात काहीही शंका नाही. सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे विनाअट मागे घेण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे आंदोलन झाले त्यामध्ये १० हजारांपेक्षा जास्त मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सगळ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच विरोधकांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारला आरक्षण द्यावंच लागलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मराठा बांधवांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे सरकारला आरक्षण द्यावं लागलं असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS