भाजप आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार,  अजित पवारांचं सूचक ट्वीट!

भाजप आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार, अजित पवारांचं सूचक ट्वीट!

मुंबई – राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत राज्याच्या उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीकडून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केले जात होते. परंतु अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पहावयास मिळालं. त्यानंतर काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी केेेल्या ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्याला मिळालेल्या पाठींब्याबद्दल सर्वांचे आभार मानत, थोडा संयम राखण्याचंही आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना केलं आहे.

दरम्यान अजित पवार रविवारी सोशल मीडियावर सक्रीय झालेले आहेत. शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलेल्या सर्व भाजपा नेत्यांचे अजित पवार यांनी आभार मानले आहेत.

COMMENTS