परभणी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेतील सभेदरम्यान ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केली आहे. आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. त्यामुळे यापुढील राष्ट्रवादीच्या सभांमध्ये शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाही. मराठवाडयाला पाच वर्षांत शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले? लोकसभेत दगाफटका झाला पाथरीने चांगलं काम केलं त्याबद्दल जाहीर आभार परंतु आतातरी ताक फुंकुन प्या सावध रहा उद्याची पहाट तुमची आहे. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव? कशाला शेतकर्यांना फसवताय असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
COMMENTS