…तरीही निवेदिता माने यांनी पक्ष सोडला – अजित पवार

…तरीही निवेदिता माने यांनी पक्ष सोडला – अजित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद दिले. त्यांना पक्षाने सर्व काही दिले असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आमची तेथील जागेबाबत मित्र पक्षासोबत बोलणी सुरू होती असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा सुरु असून ४८ पैकी ४० जागांवर आमचे एकमत झाले आहे. अन्य ८ जागांसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. तसेच मनसेला सोबत घेण्याबाबत विचारले असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ असं म्हणत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे.

COMMENTS