पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का? – अजित पवार

पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का? – अजित पवार

पुणे –  पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का? असं वक्तव्य पार्थ पवार यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. पार्थ पवारांना वारंवार ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यामुळे वडील अजित पवार यांनी माध्यमांना खडे बोल सुनावले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाणं चुकीचंच होतं. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितलं असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केल्यापासुन त्यांना नेटिझन्सकडून वारंवार ट्रोल केलं जात आहे. पार्थ पवारांनी गेल्या आठवड्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले होते.यावरुनही नेटिझन्सकडून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर वडील अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ‘सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागतं. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झालं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS