पुणे लोकसभेच्या जागेबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया !

पुणे लोकसभेच्या जागेबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली असल्याचं बोललं जात होतं. परंतु या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. अद्याप पुण्याच्या जागेसंदर्भात निर्णय झालेला नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून ८ जागांवर अद्याप चर्चा सुरु असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील कार्यक्रमता बोलत होते.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून  ४० जागांवर एकमत झाले आहे. तसेच उर्वरित आठ जागांचा तिढाही लवकरच सुटला जाईल असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS