मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असल्याचं म्हटलं. परंतु अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या असल्याचं म्हटलं आहे. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली. यावेळी ‘सामना’तील बातमीचे कात्रण हातात येताच अजितदादा म्हणाले हा तर आमचाच पेपर आहे. त्यावेळी अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही ‘सामना’ वाचतच नव्हता, असा टोलाही लगावला. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.
दरम्यान यावेळी अजित पवार यांनी प्रादेशिक समतोलाचा आरोप फेटाळून लावला. अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, अशी टीका फडणवीस करतात. मात्र, आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
COMMENTS