उदयनराजे हे स्वयंभू नेते, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासोबत कशाला फिरतील – अजित पवार

उदयनराजे हे स्वयंभू नेते, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासोबत कशाला फिरतील – अजित पवार

कराड – ‘ साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे स्वयंभू नेते असून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत उठतात, बसतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचा हल्लाबोल होत असताना साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यामध्ये दिसत नसल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान उदयनराजेंची काम करण्याची पद्धत आमच्यापेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ते साहेबांसोबत असतात. त्यामुळे ते आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासोबत कशाला फिरतील असा टोला अजितदादांनी लगावला आहे.

 

COMMENTS