अरे बापरे! काँग्रेस बारामतीतून लढणार, म्हणजे आमचं डिपॉजिट जप्त होणार – अजित पवार

अरे बापरे! काँग्रेस बारामतीतून लढणार, म्हणजे आमचं डिपॉजिट जप्त होणार – अजित पवार

पुणे – पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा बुधवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर पुणे शहरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या घोषणेनंतर बारामतीतून काँग्रेसने देविदास भन्साळी हे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याचे पवारांना सांगण्यात आले. त्यावर बोलत असताना अजितदादांनी अरे बापरे, भन्साळी यांना उमेदवारी म्हणजे आता आमचं डिपॉजिटही जाते की काय, अशी खोचक टीटा अजितदादांनी केली आहे.

राष्ट्रवादीनं या शहरासाठी खूप काम केलं आहे, आमची ताकद जास्त आहे, त्यामुळं इथं लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. तसेच आघाडी होईल नाही हे वरीष्ठ ठरवतील, पण आज मी राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे आजचा विचार करणार असून आमच्याकडे पुण्यासाठी सक्षम उमेदवार आहे, उमेदवार असल्याशिवाय मी बोलणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये गद्दारांना पुन्हा सोबत घेणार नसून याबाबत आमच्या ताईनं त्या गद्दारांना घेऊ नका असं सांगितलं असून पुण्याच्या बाबतीत अजून शांतपणे विचार केल्यानंतर सांगेन असं अजितदादांनी म्हटलं आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान तूर गैरव्यवहाराचा सखोल तपास व्हावा, अधिकारी, मंत्री जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करा, माझा डीएसकेना पाठिंबा नाही, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डीएसके आणि सिंहगडसारख्या संस्था अडचणीत आल्या आहेत. राजकारणातील गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत सहमत आहे. फक्त निवडणूक नसताना सगळे असं बोलतात. निवडणूक असली की फक्त इलेक्टोरल मेरिट पाहिला जातो. आज त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. तेव्हा त्यांनी स्वत:पासून सुरवात करावी असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS