मुंबई – राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याती 9 प्रकरणातील उघड चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या घोटाळ्याबाबत
जनमंच सामजिक संस्थेने दाखल याचिका दाखल केली होती. घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील अनेक कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप यात करण्यात आले आहेत. या विभागातील 38 सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत 6 हजार 672 कोटी इतकी होती. ती वाढवून 26 हजार 722 कोटी रुपयांवर नेण्यात आली. प्रकल्पासाठीची ही दरवाढ विदर्भ सिंचन विकास महामंडळाने केली होती. मूळ प्रकल्पाच्या सुमारे 300 पट वाढ झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. विशेष म्हणजे 20 हजार कोटींच्या वाढीव खर्चाला केवळ 3 महिन्यांत परवानगी देण्यात आली होती.
त्यामुळे याचीकेनंतर या घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले होते. परंतु आज अखेर सिंचन घोटाळ्याती 9 प्रकरणातील उघड चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
COMMENTS