मुंबई – राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मला खोटं पाडण्याचा प्रयत्न पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या, मात्र मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय, असं अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना सांगितलं.
दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजही पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आम्ही निमंत्रीत करावे असं या पत्रात म्हटलं आहे. जयंत पाटील, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन हे पत्र दिलं आहे.162 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, समाजवादी, अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतो. बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करण्याचा कारण नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही सरकार स्थापन करू शकू. फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीला धरून नाही असही शिंदे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS