शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत अजित पवारांची घोषणाबाजी !

शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत अजित पवारांची घोषणाबाजी !

मुंबई – राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतले आहेत. आज अजित पवार यांनी शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत घोषणाबाजी केली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.अजित पवार यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची भेट घेत पुन्हा सगळं काही आलबेल झालं असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे अजित पवारांनी भाजपासोबत जाणं शरद पवारांची खेळी होती अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान मी राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीसोबतच आहे आणि राष्ट्रवादीसोबतच राहील. कारण नसताना कोणतेही गैरसमज करू नका. पवारसाहेब आमचे नेते आहे त्यांना भेटणं माझा अधिकार आहे. असंही शपथविधी होण्याआधी अजित पवार म्हणाले.

COMMENTS