हर्षवर्धन पाटलांशी झालेल्या गप्पांवरुन अजित पवार म्हणतात…

हर्षवर्धन पाटलांशी झालेल्या गप्पांवरुन अजित पवार म्हणतात…

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि आता भाजपात असलेल्या हर्षवर्धन पाटील हे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कार्यक्रमात खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसले. दोघांमध्ये गप्पाही झाल्या. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असताना दोघेही एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वतःहून जागा बदलून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांशी झालेल्या गप्पांवरुन स्पष्ट केलं आहे.

दरम्यान 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा टोला अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

COMMENTS