सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी, अजित पवार म्हणाले…

सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी, अजित पवार म्हणाले…

पंढरपूर – राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष तपास पथकाने क्लीन चिट दिल्यानंतर आता ईडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यासाठी ईडीनं १९९९ ते २००९ या काळातील बीलं आणि कागदपत्रं मागवली आहेत.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळांनी सन १९९९ ते २००९ या कालखंडातील धरणांच्या निविदा, सुधारित प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना अदा दिलेली सर्व बिलं आणि कागदपत्रांची मागणी ‘ईडी’ने केली आहे.

या चौकशीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करत असतात. ते त्यांचं कामच आहे. मागच्या 6-7 वर्षांपासून चौकशी सुरूच आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणं योग्य नसल्याचं अजितदादांनी म्हटलं आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. याबाबत आज अजित पवार यांनी आज पंढरपुरात जाऊन या भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

COMMENTS