मुंबई – विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षनेते बोलत असताना सभागृहात एकही कॅबिनेट मंत्री नाही हे दिसताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा पारा चांगलाच चढला असल्याचं पहावयास मिळाले. सरकारने काय थट्टा चालवली काय? असा सवाल करत अजित पवारांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं. त्यांच्या या आक्रमकपणामुळे संबंधीत मंत्र्यांना सभागृहात हजर व्हावं लागलं.
दरम्यान झालं असं की विधानसभेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आपला विषय मांडत होते. यावेळी सभागृहात संबंधीत विभागाचे मंत्री उपस्थित नव्हते. हे लक्षात येताच अजित पावरांचा पारा चढला. ते म्हणाले, जेवढं वरचं सभागृह महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खालचं सभागृह महत्वाचं आहे. मुख्यमंत्री कुणाला करायचं आणि कुणाला नाही याचा अधिकार या सभागृहाचा आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिलेच पाहिजे असं म्हणत त्यांनी सरकारला सुनावले.त्यानंतर अजितदादांचा आक्रमकपणा पाहून संबंधीत मंत्री सभागृहात हजर झाले.
COMMENTS