मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे अभिष्टचिंतन. त्यांना निरोगी व दिघायुष्य लाभो. अशी प्राथना करतो. असं मराठीमधून ट्विट केलं आहे. या ट्विटला कोणताही फोटो त्यांनी जोडला नाही. अजित पवार यांनी इंग्रजीमधून दुसरं ट्विट केलं आहे. त्यामध्ये फोटोही टाकला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.@OfficeofUT @CMOMaharashtra
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
या इंग्रजी ट्विटमधील फोटोवरुन राजकीय कुजबूज सुरू झाली आहे. कालच मुख्यमंत्र्यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्या मुलाखतीमध्ये उद्व ठाकरे यांनी महाआघाडीच्या सरकारचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांनी शुभेच्छांसाठी वापरलेल्या फोटोमध्ये गाडीचं स्टेअरिंग त्यांच्याकडं आहे. हा फोटो टाकणं निव्वळ योगायोग आहे की अजित पवारांना काही सुचवायचं आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
COMMENTS