माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चौकशी सुरू !

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चौकशी सुरू !

बारामती – 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी सुरू झाली आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबळकर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी अजित पवार यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पाठपुरावा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचाही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपकडून सुरेश खोपडे रिंगणात होते. त्यावेळी बारामती तालुक्यातील 22 गावांचा पाण्याचा प्रश्न पेटला होता. तेंव्हा राष्ट्रवादीला मतदान केलं नाही तर तुमच्या गावचं पाणी तोडलं जाईल अशी गावक-यांना धमकी दिल्याचा अजित पवार यांच्यावर आरोप आहे. ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सुरेश खोपडे या प्रकरणाचा पाठपुरवा करत आहेत.

COMMENTS