राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी वंदना चव्हाण यांचं नाव निश्चित ?

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी वंदना चव्हाण यांचं नाव निश्चित ?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. एनडीएच्या वंदना चव्हाण यांना सर्व विरोधकांनी पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती आहे. परंतु शिवसेनेनं अजून कोणाला पाठिंबा द्यायचा हे जाहीर केलं नसल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. 9 ऑगस्टरोजी उपसभापतीपदासाठी ही निवडणूक पार पडणार असून सरकार आणि विरोधकांकडे संपूर्ण बहूमत नसल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यसभेत अजूनही भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे उपाध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता एनडीए एकसंघ राहणार का ? हा प्रश्न आहे. एनडीए एकत्र राहिला तरच त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी एनडीएकडून अकाली दलाला देण्याचं ठरलं होतं. मात्र त्यामध्ये अचानक बदल झाला. ती उमेवारी जेडीयू ला देण्यात आली. त्यामुळे अकाली दल मोदी शहांवर नाराज आहे. आता ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS