मावसभावानेच केली नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या ?

मावसभावानेच केली नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या ?

पिंपरी चिंचवड – आळंदीतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या त्यांच्या मावसभावानेच केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच कांबळेंची हत्या केली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी देहूफाटा भागात राहणारा कांबळेंचा मावसभाऊ अजय मेटकरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी बालाजी कांबळे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्यावेळी त्यांचा मावसभाऊ अजय मेटकरी याने दारुच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ केली होती. भांडणानंतर बघून घेईन, अशी धमकी अजय मेटकरीने कांबळेंना अनेकदा दिली होती. त्यामुळे त्यानेच भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या केली असल्याची फिर्याद घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे याबाबतचा अधिक माहिती पोलिस तपासानंतरच उघड होणार आहे.

 

COMMENTS