मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. तर सतर्कता म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.
राज्यात कुठे काय झाले
कोकण
रायगडात आज ठिकठिकाणी मोर्चा, ठिय्या आंदोलन एस. टी. सेवा ठप्प झाली आहे. अलिबाग आगारातून एकही बस सुटली नाही किंवा आली नाही. तसेच काही शाळांनी केली सुट्टी जाहीर. काही शाळा सुरू मात्र विद्यार्थ्याची तुरळक उपस्थिती पहावायस मिळत आहे. आजच्या सकल मराठा समाज ‘जेल भरो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंदोलनावेळी होणारे बस गाड्यांचे नुकसान व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासनाने बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी बस वाहतुकीसह सर्व व्यवहार सुरू राहतील असे स्पष्ट केले तरीही खबरदारी म्हणून बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला आहे. सर्व बस गाड्या डेपोमध्ये. गोव्याच्या ‘कदंबा’ प्रशासनाने देखील आपल्या सिंधुदुर्गातील वस्तीच्या बस गाड्या रात्रीच गोव्यात परत घेऊन येण्याचे चालकांना आदेश देण्यात आले आहेत.
हिंगोली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज हिंगोली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मध्यरात्री सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण. सेनगांव शहरातील तोष्णीवाल कॉलेजच्या प्रांगणातील मिनी स्कूल बस पेटवली आहे. तसेच पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांनी पेटलेली बस विझवण्यात आली आहे.
यवतमाळ
विदर्भ मराठवाडा सीमेवर मार्लेगाव जवळ रस्त्यावर टायर पेटविले, दगड लाकूड ठेऊन नागपूर – तुळजापूर राज्य मार्ग बंद करण्यात आला.
लातूर
महाराष्ट्र बंदचे आंदोलन जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पेटलं, लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथे टायर जाळून मध्यरात्री रास्तारोको करण्यात आला, आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आली जोरदार घोषणाबाजी.
पुणे
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात कडकडीत बंद. रेल्वे स्टेशन, एसटी आगारात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. एक्स्प्रेस हायवेसह जुना मुंबई पुणे हायवे सूनासुना दिसत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण येथे मागील बंदच्या वेळी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. दौंड, भोर, बारामती, खेड, शिरूर, जुन्नर आणि मावळ तालुक्यात काही मोबाईल कंपन्यांकडू इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड
शहरात बंदला चांगला प्रतिसाद.शहरातील सर्व बाजारपेठा बंद. शाळा महाविद्यालय बंद. हिंजवडी मधील बहुतांश आय टी कंपन्या बंद.
नाशिक
शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने नाशिक बंदची हाक देण्यात आली नाही. आणि चक्काजाम आंदोलन केले जाणार नाही.मात्र डोंगरे वसतिगृह येथे ठिय्या आंदोलन केले जात आहे. मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागातून एकही बस सोडण्यात आलेली नाही.याशिवाय सरकारी शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी खासगी शाळांमध्ये बंद बाबत संभ्रम असल्याने काही शाळा सुरू आहेत.
धुळे
मराठा क्रांती मोर्चाचे जिल्ह्यात पडसाद उमटले असून शाळांना सुट्टी तर लांब पल्याच्या एसटी बस सेवा ठप्प करण्यात आली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्यात 1700 पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नंदुरबार
मराठा क्रांती मोर्चाचा बंद जिल्ह्यात स्थगित करण्यात आला आहे. आदिवासी गौरव दिन असल्याने समन्वयातुन बंद न ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चानं निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई
नवी मुंबई बंदमधून माघार घेतली असली तरी एपीएमसी मार्केट बंद , शाळा कॉलेज बंद, मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जालना
फुलंब्री-राजूर, भोकरदन-जाफ्राबाद,जाफ्राबाद-देऊळगाव राजा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत,दीड तासापासून वाहतूक विस्कळीत,ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून टायरची जाळपोळ केल्याने वाहतूक विस्कळीत.
उस्मानाबाद
जिल्हयात मराठा आरक्षण बंद बाबत खबरदारी म्हणून शाळा बंद, एस टी बसेस वाहतूक बंद.
उस्मानाबाद शहरात आंदोलक करणार रक्तदान. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कळंब- बार्शी रस्त्यावर अज्ञात आंदोलकांनी
झाड तोडून टाकले.
सोलापूर
मराठा संघटना संपातून माघार, फक्त चक्का जाम, मूक अंदोलन होणार
जळगाव
भुसावळमध्ये बंदचे आवाहन ११ नंतर रास्ता रोको, जळगावात दुपारी २ वाजता गिरणा ननदीपुलावर रास्ता रोको. काही तालुक्यातही बंदचे आवाहन
पंढरपूर
पंढरपूर शहर व तालुका शंभर टक्के बंद, इंटरनेट सेवा बंद, एसटी वाहतूक बंद, मंदिर परिसरात तुरळक गर्दी, शहरातील सर्व दुकाने बंद
सांगली
मराठा आरक्षण अंदोलनाच्या पार्श्वभूमिवर – सांगली जिल्ह्यातील ST सेवा बंद, ST सेवा बंद ठेवन्याच्या ST प्रशासनाचा निर्णय. ST बसेस च्या लोकल, जिल्ह्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील ST च्या फेऱ्या रद्द, ST बसेस सांगली ST स्टैंड वर थांबून.
अकोला
बससेवा सध्या सुरळीत सुरू आहे.वातावरण पाहून बस सेवा बंदचा निर्णय घेण्यात येणार आहे.
बीड
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळा महाविद्यालये बंद ,विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बस बंद, प्रवाशांचे हाल,जिल्हाभरातून तब्बल एक हजार पेक्षा जास्त बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई
आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावच्या टेहरे येथे रास्तारोको सुरु. शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले असून महिला व लहान मुलांचाही यामध्ये सहभाग आहे.
COMMENTS