जळगाव – अबब… नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र !

जळगाव – अबब… नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र !

जळगाव –  जिल्ह्यातील अमळनेर नगर पालिकेतील तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांनी ही कारवाई केली आहे. अपात्र ठरवलेल्यांमध्ये थेट जनतेतून निवडूण आलेल्या नगारध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांचाही समावेश आहे. पुष्पलता पाटील या माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी आहेत. साहेबराव पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अपात्र घोषित करण्यात आलेले सर्व नगरसेवक हे शहर विकास आघाडीचे आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील यांची ही आघाडी आहे. या निर्णयामुळे साहेबराव पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. अतिक्रम हटाव मोहिमेला स्थगिती देण्याबाबत ठराव केल्याप्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. शिरीष चौधरी मित्रमंडळ आघाडीच्या तिघा नगरसेवकांनी जिल्हाधिका-यांकडे याबबात तक्रार केली होती.

COMMENTS