मुंबई – अॅमेझॉन वेबसाईट व अॅपवर मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी मनसेने राबविलेल्या नो मराठी नो अॅमेझॉन या मोहिमेनंतर अॅमेझॉन कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व पदाधिकाऱ्यांना नोटिस पाठविल्यानंतर राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर शुक्रवारी राज्यभरातील अॅमेझॉनच्या कार्यालयात खळखट्याक् केले. त्यानंतर अॅमेझॉनने नरमाईची भूमिक घेत लवकरच वेबसाईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसेने यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर मुंबईत लावण्यात आले होते.
दरम्यान, कंपनीने न्यायालयात धाव घेऊन ही मोहिम राखण्याचा नोटीस पाठवले. त्यास प्रतित्तुर मनसे स्टाईलने राज्यभऱात देण्यात आल्यानंतर “त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे.
COMMENTS