अॅमेझाॅनप्रकरणी मनसेला न्यायालयाचे नोटीस

अॅमेझाॅनप्रकरणी मनसेला न्यायालयाचे नोटीस

मुंबई – अॅमेझॉनच्या वेबसाइटवर मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याने मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळेच अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आहे.अॅमेझाॅन कंपनीला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करण्यापासून कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, त्यांच्या कामात अडथळा आणू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबईतील दिंडोशी दिवाणी न्यायालयाने आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला दिले आहेत.

दरम्यान, मनसेने आपल्या ट्विट करून आपली भूमिक स्पष्ट करत महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!’, असे मनसेने बजावले आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1342061378249486336?s=20

COMMENTS