बीड – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून न्यायालयानं त्यांना मोठा दणका दिला आहे. जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता विक्री अथवा खरेदी करता येणार नसल्याचा आदेश अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मुंडे यांना दिला आहे.
दरम्यान बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जगमित्र नागा सूत गिरणीने घेतलेल्या कर्जाच्या थकबाकी पोटी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सर्व मालमत्ता तारण ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे यांचे घर, कार्यालय, तसेच शेतजमीन अशा ज्या ज्या गोष्टी तारण आहेत त्यांची खरेदी अथवा विक्ती करता येणार नसल्याचं न्यायालानं म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
दरम्यान परळी येथील संत जगमित्र नागा सहकारी सूत गिरणी साठी 2001 पासून जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र 2010 नंतर हे कर्ज थकीत झाले,त्यामुळे वसुलीसाठी बँकेने न्यायालयात खटला दाखल केला,या प्रकरणाची अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मुंडे यांचे घर,कार्यालय,परळी,पिंपळगाव घोडा,कवडगाव,परळी येथील शेतजमीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खटल्याचा निकाल लागेपर्यंत या मालमत्तेची खरेदी विक्री करता येणार नाही असेही म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणात मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत.
COMMENTS