अकोला – आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आघाडीच्या लेखी पत्राला प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारेच उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी चार पानी पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला लिहिलं आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसनं वारंवार आपली भूमिका बदलल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असल्याचहू प्रकाश आंबेडकरांनी पत्रातून म्हटलं आहे. आपली भूमिका जागांसंदर्भात नसून तात्विक मुद्द्यांवर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसप्रणीत महागठबंधनमधील घटक पक्षांतील विधीतज्ज्ञ नेत्यांची समिती गठीत करण्याची मागणीही आंबेडकरांनी या पत्रात केली आहे.
@RVikhePatil आपले पत्र मिळाले. मात्र काँग्रेसचे ऑफिस बंद असल्याने, आपल्या पत्रास, माझे उत्तराचे पत्र मी आपल्या ऑफिसमध्ये दिले आहे. कृपया नोंद घ्यावी. @Jayant_R_Patil pic.twitter.com/saOZfMowUH
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 4, 2019
COMMENTS