धनंजय मुंडे हेच खरे स्टार – अमिषा पटेल

धनंजय मुंडे हेच खरे स्टार – अमिषा पटेल

परळी – कहो ना प्यार है म्हणत ती आली… तिने पाहिले…आणि तिने हजारो परळीकरांना अक्षरशः जिंकुन घेतले…. हे दृश्य होते गुरूवारी सायंकाळी परळी शहरातल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या उद्घाटनाचे… हजारो रसिकांची मने जिंकुन घेताना आम्ही फक्त पडद्यावरचे स्टार आहोत. परळीसाठी, गरीबांसाठी आणि सामान्यांसाठी काम करणारे तुमचे नेते धनंजय मुंडे हेच खरे स्टार आहेत असे म्हणत तिने प्रेक्षकांच्या दुप्पट टाळ्या मिळवल्या तर शेतकर्‍यांसमोरील दुष्काळाचे सावट दुर कर आणि महागाई कमी करण्याची सुबुध्दी सरकारला दे असे साकडे घालत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून विघ्नहर्त्या गणरायाला घातले.

संपुर्ण राज्यात गाजलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचा शुभारंभ आज हिंदी चित्रपटश्रेष्टीतील कहो ना प्यार हैं, गदरसह अनेक चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे यांच्यासह परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज पासून दहा दिवस चालणार्‍या या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अमिषा पटेलचे आगमन होण्यापूर्वीच संपुर्ण मोंढा मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. कहो ना प्यार है च्या गाण्याच्या ओळी सुरू असतानाच ती आणि धनंजय मुंडे यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सर्व प्रेक्षकांना अभिवादन करीत या दोन्ही स्टार्सनी शेवट पर्यंत प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली. श्रीफळ फोडून महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर श्री. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी अमिषा पटेल हीचा सत्कार केला तर नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे यांनी सौभाग्य अलंकार, साडी, शाल देऊन अमिषा पटेल हीचे स्वागत केले.

प्रेक्षकांना सोबत घेत कहो ना प्यार है या गाण्याच्या ओळी म्हणत अमिषा पटेलने आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत करून गणपती बाप्पा मोरया ची घोषणा करतानाच प्रेक्षकांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे तिला गणपती बाप्पा मोरया असा प्रतिसाद देऊन गणेशाच्या जय-जयकाराने संपुर्ण परिसर दुमदुमून टाकला. परळी सारख्या छोट्या शहरात इतक्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन होत आहे याचे मला आश्चर्य वाटते. इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे तिने सुरूवातीलाच आभार व्यक्त केले. आम्ही चित्रपटातील कलाकार हे खरे स्टार नसून, गरीबांसाठी, सामान्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी काम करणारे धनंजय मुंडे हेच खरे स्टार आहेत. ते मुंबईत अनेकदा भेटतात मात्र बाकी गप्पांऐवजी नेहमीच त्यांच्या बोलण्यात समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळच दिसून येते. अशा शब्दात अमिषा पटेल हीने धनंजय मुंडे यांच्या कामाचा गौरव केला. आपल्या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांना माहिती देऊन पुन्हा परळीला बोलवा मी परळीला येईल असे म्हणत तिने परळीकरांचे आभार मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी या महोत्सवाने शहराला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले असल्याचे सांगितले. राज्यात, केंद्रात सत्ता नसली तरी परळी विकासात अग्रेसर ठेवण्याचा शहराचा नावलौकिक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही येथील लोक प्रतिनिधी शहराचा विकास करणे तर दुरच शहराचे दैवत असलेल्या वैद्यनाथाचीही उपेक्षा करीत असल्याचे सांगितले. केंद्राच्या पर्यटन विभागाने व रेल्वे विभागाने 12 ज्योतिर्लिंगाच्या यादीतून परळीच्या वैद्यनाथाला वगळून झारखंड मधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश केल्याबद्दल त्यांनी तिव्र निषेध व्यक्त केला.

आज शेतकरी दुष्काळामुळे संकटात आहे. सामान्य माणुस महागाईने हैराण झाला आहे. या शेतकर्‍यांवरील दुष्काळाचे संकट दुर होवु दे आणि रोज वाढणारे पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर आणि महागाई कमी करण्याची सुबुध्दी सरकारला दे असे साकडे त्यांनी घातले.

जब-जब में बिखरा हुँ, दुगनी रफ्तार से मे निखरा हुँ

आज न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून सुरू असलेल्या बदनामीचा संदर्भ घेत तुम लाख कोशिश करो, मुझे बदनाम करने की… जब-जब में बिखरा हुँ, दुगनी रफ्तार से मे निखरा हुँ. अशा शब्दात त्यांनी सरकारला तडाखेबंद प्रत्युत्तर दिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. बाजीराव धर्माधिकारी यांनी केले तर संचलन श्री. चाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार नितीन कुलकर्णी यांनी मांनले. उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या तुमच्यासाठी कायपण या कार्यक्रमाला ही मोठा प्रतिसाद मिळाला.

COMMENTS