नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक हारलो तर देश मागे जाईल असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक असून भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक असलेल्या मराठा सैन्याचा पराभव झाला. या पराभवामुळे देशाला पुढील २०० वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. या काळात देश बराच पिछाडीवर पडला होता. २०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई असल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विरोधकांकडे नेतृत्वासाठी चेहरा नसून याउलट नरेंद्र मोदी हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत जनतेने पराभूत केलेले सर्वजण केवळ एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येणे ही म्हणजे जनता आणि मोदींची ताकद मान्य केल्याची पोचपावती असल्याचंही यावेळी शाह यांनी म्हटलं आहे.
BJP President Amit Shah at BJP National Convention at Ramlila Maidan in Delhi: In Uttar Pradesh, I am in constant touch with the state unit & I can confidently say that the number of seats we win this time can become 74, but will not decrease to 72. pic.twitter.com/UWlYEU5nPg
— ANI (@ANI) January 11, 2019
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसेल, असे सर्वजण सांगतात. मात्र, उत्तर प्रदेशमधील सध्याची परिस्थिती पाहता मी सांगेन की, येथे भाजपला ७२ पेक्षा जास्तच जागा मिळतील. मोदी सरकारच्या काळात गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कामे झाली. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळेच दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा बसला असल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे.
तसेच ल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढला. आतापर्यंत भारतीय पंतप्रधान विदेशात गेल्यावर वर्तमानपत्रांमध्ये केवळ त्यांची छायाचित्रे छापून यायची. मात्र, दाव्होस परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिषदेच्या उद्घाटनाचा मान देण्यात आला. ही भारताच्यादृष्टीने अत्यंत गौरवाची बाब असल्यांही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
COMMENTS