मुंबई – भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा आग्रही आहे. याबाबतच शाह यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली असल्याची माहिती आहे. तसेच युतीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंतीही शाह यांनी ठाकरेंना केल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान शिवसेनेकडून याआधी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली जात होती. पण मोठे भाऊ आहोत आणि रहाणार असे वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावरुन शिवसेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीत युतीसाठी तयार असल्याचेच संकेत दिले. त्यानंतर आज अमित शाह यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युतीची घोषणा लवकर होईल असं दिसत आहे.
COMMENTS