सरकार कोसळल्यानंतर अमित शाहांची जम्मू-काश्मीरमधली पहिली प्रतिक्रिया !

सरकार कोसळल्यानंतर अमित शाहांची जम्मू-काश्मीरमधली पहिली प्रतिक्रिया !

जम्मू-काश्मीर – सरकार कोसळल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला आहे. या दौ-यादरम्यान अमित शाह यांनी पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोसळल्यानंतर राजकीय पक्ष खेद व्यक्त करतात पण भाजपा हा असा एकमेव पक्ष आहे जो सरकार कोसळल्यानंतरही ‘भारत माता कि जय’ असा नारा देत असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.तसेच यातून भाजपाची देशभक्ती दिसून येत असल्याचंही यावेळी शाह यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसने कितीही षडयंत्रे रचली तरी काश्मीर भारतापासून अलग होणार नसल्याचंही यावेळी शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपासाठी सरकार नाही तर जम्मू-काश्मीरचा विकास आणि सुरक्षा ही दोनच महत्वाची उद्दिष्टये आहेत असे शहा म्हटलं आहे. तसेच राज्यातील मेहबूबा सरकारने विकासाचे संतुलन खराब केले. आज जम्मू-काश्मीर भारताशी जोडलेला आहे तो श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच असंही यावेळी शहा यांनी सांगितले आहे. मेहबूबा सरकारने जम्मू आणि लडाखमध्ये भेदभाव केला असा आरोपही यावेळी अमित शाह यांनी केला आहे.

COMMENTS