नवी दिल्ली – भाजप आमदाराची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजपा आमदार प्रणव सिंह चॅम्पिअन यांनी काही दिवसांपूर्वीच हातात दारु आणि बंदूक घेऊन बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपाने त्यांच्या या व्हिडीओची गंभीर दखल घेत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रणव सिंह याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हारयल झाला. हा व्हिडीओ अनेक वाहिन्यांवरही प्रसारीत झाला. या व्हिडीओमध्ये प्रणव सिंह आपल्या समर्थकांसह नाचताना त्यांनी एका हातात दारूचा ग्लास आणि दुसय्रा हातात एक, दोन नाही तर चार बंदुका घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच त्यांनी उत्तराखंडमधील भाजपाच्या अजय भट्ट यांना प्रणव सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
COMMENTS