नवी दिल्ली – कर्नाटकधील निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अखेर मौन सोडलं असून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच कर्नाटकमधली जनतेचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष भाजप बनला असून कर्नाटकातील कोट्यावधी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील वेळी ४० जागा होत्या यावेळी १०४ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप प्रचारचा केंद्र बिंदू होता. तसेच काँग्रेसने व्होटबॅंकसाठी तुष्टीकरण केले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्नाटकात ३७०० शेतक-यांनी आत्महत्या केली. १७३ टक्के आत्महत्यांची वृद्धी झाली. या मुद्द्यांवरून निवडणूक लढविली असून कर्नाटकच्या विकासाला गती देण्यासाठी मोदी सरकारने काम केले. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी कर्नाटकला दिला. हा मॅन्डेन्ट काँग्रेस विरोधातील असल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या एका जागेवर निवडणूक हरले. तर दुस-या जागेवर कमी मतांनी जिंकले. तसेच पूर्ण बहुमत नसतानाही भाजपने दावा का केला, हे आम्हाला विचारलं जातंय, मग कोणत्याच पक्षाचे नाही, आम्ही पण सरकार बनवण्याचा दावा करायचा नाही का? असा सवालही यावेळी शाह यांनी केला आहे. तसेच आम्ही दावा केला कारण कर्नाटक जनतेने आम्हाला मॅन्डेट दिला आहे. तसेच मॅजिक फिगरपासून ७ जागा दूर आहोत. भाजपचे केवळ ७ उमेदवार नोटा पेक्षा कमी मतांनी हरले असल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच आत्ता कर्नाटकची जनता जल्लोष करत नाही तर काँग्रेस आणि जेडीएस जल्लोष करत आहेत.हा कशाचा जल्लोष साजरा केला जातोय ? अनेक ठिकाणावर काँग्रेस, जेडीएसची जमानत जप्त झाली. त्यावर जल्लोष साजरा केला जातोय का? असा सवालही अमित शाह यांनी काँग्रेस-जेडीएसला केला आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसने धन-बलाचा प्रयोग केला. १० विधानसभा लढवली जाऊ शकते ऐवढा पैसा जप्त केला असल्याचंही शाह यीं हटलं आहे. तसेच निवडणुकीदरम्यान फेक आयडी केल्याची फॅक्टरी पकडली. १४ राज्यांचा पराभव मोठा की ९ लोकसभा जागांचा पराभव मोठा ? असा सवाल करत शाह यांनी काँग्रेसने पराभवाची व्याख्या बदलली असल्याचं म्हटलं आहे. तसेच जेडीएसचे कुमारस्वामी यांचे काँग्रेसबद्दलचे काय वक्तव्य केले होते, त्याची एक कॉपी सर्वांना देणार आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, ईव्हीएम योग्य असल्याचे काँग्रेसशासित वाटत आहे. पराभव झाल्यावरही काँग्रेसने या गोष्टी लक्षात ठेवाव्या. ममता, अखिलेश आपआपल्या राज्यात आमच्या विरोधात होते. आम्ही २०१९ मध्ये जिंकणारच काँग्रेसच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टाला खोटे बोलले. येडियुरप्पा यांनी राज्यपालांकडे ७ दिवसांचा अवधी मागितला नव्हता. १५ दिवसांचाच वेळ मागितला होता. काँग्रेसने खोटा प्रचार केला असून
जनतेचा संपर्क आमदारांनी केला असता तर त्यांना जनतेने सांगितले असते कोणाच्या बाजूने मत द्यायचे. परंतु मीडियाने कॉल रेकॉर्डींगची तपासणी न करता बातमी चालविली असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. हॉटेलमध्ये आमदारांना का डांबून ठेवले. याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे. आमदारांना एकदा बाहेर येऊ द्यावे, मग पाहू असा इशाराही शाह यांनी दिला आहे.
COMMENTS