हैदराबाद – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा तापणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, राम मंदिर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हती. परंतु अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यनंतर आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापणार असल्याचं दिसत आहे. सध्या न्यायालयीन घटनाक्रम पाहता राम मंदिराच्या बांधकामास लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात होईल, असा विश्वास अमित शाह यांनी या बैठकीत व्यक्त केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
COMMENTS