भाजपा-शिवसेना युतीवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य !

भाजपा-शिवसेना युतीवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य !

मुंबई – भाजपा शिवसेना युतीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 2019 ला शिवसेना भाजपासोबत असेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळला जावा यावर एकमत झालं असल्याची माहिती आहे.

दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीत आमचीच सत्ता येईल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. सहा राज्यांमध्ये भाजपाचं सरकार होतं, आता 16 राज्यांमध्ये आहे. मग तुम्हीच सांगा 2019 मध्ये कोण विजयी होणार ? असा सवाल अमित शाह यांनी केला आहे. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये लागलेला निकाल नक्कीच भाजपाच्या बाजूने नाही, परंतु त्याचा संबंध 2019 लोकसभा निवडणुकीशी जोडणं चुकीचं असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. महाआघाड्यांची चर्चा व्यर्थ असून सत्ता आमचीच येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS