नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: अमित शाह यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन शाह यांनी केले आहे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. माननीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह यांनी स्वत: लक्ष घातले होते. परंतु गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तसेच अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS