नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज बोलता बोलता मोठी चूक केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत असताना त्यांचं नाव घेण्याऐवजी शाह यांनी त्यांच्याच पक्षातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांचं नाव घेतलं आहे. जर भ्रष्टाचारासाठी कुठल्या सरकारला बक्षीस द्यायचं असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवं असं चुकून अमित शाह बोलले आहेत. “सुप्रीम कोर्टाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की, भ्रष्टाचारासाठी कुठलं सरकार पात्र असेल तर ते येडियुरप्पांचं सरकार आहे.” असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच शेजारी बसलेल्या व्यक्तिनं त्यांना चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शाह यांनी चूक सुधारत सिद्धरामय्या सरकार असं म्हटलं आहे.
दरम्यान त्यांच्या या चुकीचा फायदा घेत सिद्धरामय्या यांनी लगेच सदर वक्तव्य ट्विट करत शाह यांचे धन्यवाद मानले आहेत. तुम्ही अखेर सत्य वदलात असे उद्गार सिद्धरामय्या यांनी काढले आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असून 12 मे रोजी एकाच टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच 15 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
The #ShahOfLies finally speaks truth. Thank you @AmitShah pic.twitter.com/WczQdUfw5U
— Siddaramaiah (@siddaramaiah) March 27, 2018
COMMENTS