कर्नाटक – कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा कर्नाटकचा दौरा करणार आहेत. या दो-यादरम्यान ते पक्षबांधणीसाठी विविध ठिकाणी बैठका घेऊन रॅली काढणार आहेत. गुजरातमध्ये काठावर पास झाल्यामुळे कर्नाटकमध्ये अशी अवस्था होऊ नये यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. परंतु अमित शाहांची जादू कर्नाटकात चालणार नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
Amit Shah's magic will not work in Karnataka: CM Siddaramaiah on Amit Shah's visit to the state pic.twitter.com/5kYEoSmo9F
— ANI (@ANI) December 31, 2017
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून हिमाच प्रदेशप्रमाणेच कर्नाटकमध्येही काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. परंतु अमित शाहांचा हा प्रयत्न फसणार असून हिमाचल प्रदेशप्रमाणे त्यांची कर्नाटकात जादू चालणार नाही असं ते म्हणाले आहेत. कर्नाटक जनतेचा कौल आमच्याबाजूनेच असून पुढील निवडणुकीतही आम्ही बहूमतानं निवडून येऊ असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS