मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशभरातील विविध नेते आणि नामांकित व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. काल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगपती रतन टाटा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली तर लता मंगेशकर यांची तब्बेत चांगली नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. कालच शिवराज्याभिषेक दिन होता. त्यानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडवार आले होते. अमित शहा यांनी माधुरी दीक्षित यांच्या घरी गेले पण रायगडावर गेले नाहीत यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्वी चलो चले मोदींजींके साथ शिवछत्रपतींचा आशिर्वाद असं म्हणून जनतेची मतं घेतली. मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजप शिवरायांना विसरले. काल शहा माधुरी दीक्षितच्या घरी गेले पण रायगडावर गेले नाहीत अशी टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली आहे. शिवराज्यभिषेक दिन असताना त्यांना एवढ्याजवळ येऊनही रायगडावर जावं वाटलं नाही. त्यांचं शिवाजी महाराजांवरील प्रेम हे फक्त मतांसाठी होतं अशी टीकाही जगताप यांनी केली आहे.
सोशल मीडियातूनही यावरुन भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका होत आहे. मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला का आले नाहीत असा सवाल शिवप्रेमींनी सोशल मीडियातून विचारला आहे.
COMMENTS