पालघर – लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव झाला असला तरी पक्षाला चांगली मते मिळाली. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तलासरीमध्ये आज जाहीर सभा झाली. या सभेकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे काल झालेल्या अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीबाबत काय बोलतात याकडं सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र सभेत भाषण करताना त्यांनी याबाबत थेट भाष्य करणं टाळलं.
त्यामुळे सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी गाठलं. मात्र पुन्हा पुन्हा विचारुनही त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी देशभारत या बैठकीविषयी उत्सुकता लागली आहे असं पत्रकारांनी सांगितल्यावर. अशी उत्सुकता आणखी ताणायला हवी असं सांगत त्यावर भाष्य करायला नकार दिला. मात्र या जागेवर पुन्हा 2019 मध्ये श्रीनिवास वनगा हेच शिवेसनेचे उमेदवार असतील असं सांगत स्वबळाचे संकेत दिले आहे. पोटनिवडणुकीसाठी फक्त 15 दिवस मिळाले आता लोकसभेसाठी 8 ते 9 महिने आहेत. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांना निवडणू आणूच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS