अमळनेर – माझी आई एक सामान्य गृहिणी असून ती आज देखील पिशवी घेऊन बाजारात भाजी विकत घ्यायला जाते. स्वतः गॅस बुक करते. आज भाजीपाल्यापासून गॅसपर्यंत महागाई वाढलेली आहे. तेव्हा आई मला म्हणते, ‘तुमच्या काळात एवढी महागाई नव्हती, आज खुपच महागाई असून पैशांची बचतच होत नाही’, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अमळनेरमधील हल्लाबोल यात्रेच्या सभेत त्या बोलत होत्या.
दरम्यान उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आज अमळनेर येथे तेराव्या सभेसाठी त्या उपस्थित असताना बोलत होत्या. “काहींचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की शरद पवार यांच्या पत्नी बाजारात स्वतः भाजी आणायला जातात. आघाडी सरकारची सत्ता होती तेव्हा टीव्हीवर भाजपची जाहिरात लागायची, ‘बहोत हुई मंहगाई की मार… ” तेव्हा आई म्हणायची तुमच्या राज्यात किती महागाई झाली”. मी आणि साहेब गपचीप ते ऐकूण घ्यायचो, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. तसेच सध्या तथाकथित अच्छे दिनचे राज्य आले आहे, तेव्हा मी तिला विचारते की आज काय परिस्थिती आहे. तर ती म्हणते, जुनी परिस्थितीच चांगली होती. तुमच्या काळात बचत व्हायची ती देखील आज होत नाही. आपल्या आईबद्दलचा हा किस्सा सांगून सुप्रियाताईंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
COMMENTS