अमळनेर नगरपालिकेतील शहर विकास आघाडीला धक्का, सर्वच नगरसेवक अपात्र !

अमळनेर नगरपालिकेतील शहर विकास आघाडीला धक्का, सर्वच नगरसेवक अपात्र !

जळगाव – अमळनेर नगरपालिकेतील शहर विकास आघाडीचे सर्व २३ नगरसेवक अपात्र ठरवण्यात आले आहेत. अपात्र नागरसेवकांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचाही समावेश आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देण्याबाबत ठराव केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी त्यांच्यावर कारवाई केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देण्याबाबत ठराव केल्याप्रकरणी शिरीष चौधरी मित्रमंडळ आघाडीच्या तिघा नागरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीनंत जिल्हाधिका-यांनी शहर विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 23 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

COMMENTS