पुणे – डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काल राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हे यांना कडवे आव्हान असणार आहे.
या मतदारसंघात आढळराव पाटील यांचा जनसंपर्क मोठा आहे. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघात जवळपास ८० टक्के ग्रामीण भाग आहे. त्यामुळे राजकरणात आणि राष्ट्रवादीत नवे असलेल्या कोल्हे यांना त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच या मतदारसंघात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे याचा फायदा कोल्हे यांना होणार असून हे आव्हान ते कसं पेलवतील ते आगामी निवडणुकीत समजणार आहे.
COMMENTS