अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील समोरासमोर येतात तेंव्हा…

अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील समोरासमोर येतात तेंव्हा…

पुणे – लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात एकमेकांविरोधात उभा ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे समोरासमोर आले असल्याचं पहावयास मिळाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330 व्या बलिदान दिनी आज तीर्थक्षेत्र वढू – तुळापूर इथे हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. त्यावेळी त्यावेळी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकमेकांचे हात हातात घेत हस्तांदोलन केलं.

दरम्यान एकमेकांचे विरोधक एकमेकांसमोर एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने दोघांनाही अवघडल्यासारखं झालं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापटही उपस्थित होते. त्यावेळी गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली.

निवडणूक प्रचारादरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. अमोल कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीने त्यांना शिरुरमधून उमेदवारी दिली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु समोरासमोर येताच या दोन्ही नेत्यांनी मात्र सर्वकाही विसरुन हस्तांदोलन केलं असल्याचं पहावयास मिळाले.

COMMENTS