मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोना
रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आकडा आता 42 वर गेला आहे. पुण्यात सर्वाधिक 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे 8, मुंबई 7, कल्याण 3, नवी मुंबई, नागपूर 4, यवतमाळ 3,
3, रायगड 1, ठाणे 1, अहमदनगर 1, औरंगाबादमध्ये एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे.
हात धुण्याबाबत खासदार अमोल कोल्हेंनी भन्नाट आयडिया सुचवली आहे. हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
कोरोनापासून वाचण्याचा हा सर्वात साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कोरोना घाबरु नका पण जागरुक राहा असं आवाहनही कोल्हे यांनी केलं आहे. तसेच अमोल कोल्हेंनी जनतेला गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन केलं आहे.
प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वोपतरी प्रयत्न करत आहे…
त्यांना साथ देऊ!
कोरोनाला घाबरू नका..
परंतु जागरूक रहा! #corona #covid_19#LetsFightCorona #coronaoutbreak #covid19india pic.twitter.com/TbTsIxguNE— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 18, 2020
COMMENTS