माझ्यारखी वेळ कोणत्या शिवसैनिकावर येऊ नये –अनंत गीते

माझ्यारखी वेळ कोणत्या शिवसैनिकावर येऊ नये –अनंत गीते

औरंगाबाद – माझ्यावर आली तशी वेळ कोणत्या शिवसैनिकावर येऊ नये, असं काम करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी केलं आहे. ते शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात बोलत होते.  शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा विडा उचलला होता. मात्र, त्यांनी त्यांच्या मुलाला आमदार करायचं म्हणून माझ्या कार्यालयात येऊन त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही यावेळी अनंत गीते यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुले काही काळ खळबळ उडाली असल्याचं पहावयास मिळालं.

दरम्यान यावेळी बोल असताना अनंत गिते यांनी मागिल लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केलं आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मी कमी मताने निवडून आलो. या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाविरोधात लढल्यामुळे माझी पीछेहाट झाली होती.  इतकंच नाही, तर मी स्वकियांसोबत म्हणजेच रामदास कदम यांच्यासोबतही निवडणूक लढलो. त्यांनी मला पाडण्याचा निर्णय घेतला होता.परंतु मी विजयी झालो. त्यानंतर त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली, कारण त्यांच्या मुलाला आमदार करायचं होतं. त्यामुळे असा प्रसंग महाराष्ट्रात कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचंही यावेळी अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS